PF अकाऊंट असणाऱ्यांसाठी 'अत्यंत' महत्त्वाची बातमी..

सागर आव्हाड
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

  • तुमचं पीएफ अकाऊंट असेल तर व्हा सावध !
  • पीएफ अकाऊंट कधीही होऊ शकतं रिकामं
  • फोनवरून माहिती घेऊन भामटे घालतायत गंडा

पैसे सुरक्षित कुठे ठेवायचे हाच प्रश्न आता पडू लागलाय. ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण एवढं वाढलंय त्यामुळं पीएफ अकाऊंटही आता सुरक्षित नाहीये. पीएफ ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याची माहिती विचारली जाते. फसवणूक करणारे आपण पीएफ ऑफिसमधून बोलत असल्याचा बहाणा करतात. आणि मग महत्त्वाची माहिती विचारून पीएफ अकाउंटमधून पैसे काढतात. त्यामुळं आपण काळजी घ्यायला हवी. आपलं पीएफ अकाउंट असेल तर काय खबरदारी घ्यायला हवी हे आम्ही सायबर एक्सपर्टकडून जाणून घेतलं.

का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

ईपीएफओ कधीच आपल्या ग्राहकांना त्यांचा आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, यूनिवर्सल अकाउंट नंबर मागत नाही. इतकंच नव्हे तर ईपीएफओ कधीच त्यांनी जमा केलेल्या पैशांची विचारणा करत नाही. त्यामुळं आपण काय काळजी घ्यायला हवी 

  1. ईपीएफओ आपल्या ग्राहकांकडून माहिती मागत नाही
  2. आधार, पॅन नंबर, बँकेची माहिती कुणालाही देऊ नका
  3. ईपीएफओनं जमा केलेल्या पैशांची विचारणा करत नाही 
  4. मोबाईलवर लिंक आल्यास ओपन करू नका
  5. विश्वास बसत नसल्यास पीएफ ऑफिसला संपर्क करावा

यासंदर्भातल्या तक्रारी वाढल्याने ईपीएफओने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोकांना सावध केलंय. पीएफ अकाऊंटची माहिती कोणालाच देऊ नका असं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे ग्राहकांनी आता जागरुक राहण्याची गरज आहे.

WebTitle : very important news for all PF account holder must read

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: very important news for all PF account holder must read