व्होडाफोन ग्राहकांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आधी वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मुंबई : भारतातील एक महत्त्वाची दूरसंचार कंपनी म्हणून व्होडाफोनकडे पहिलं जातं. आता लवकरच व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार असल्याची माहिती आता समोर येतेय. सरकार ऑपरेटरवर लादत असलेला अधिक कर आणि शुल्क यामुळे कंपनीच्या भारतातील भविष्याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. खुद्द कंपनीचे अधिकारी निक रीड यांनी याबाबत माध्यमांना त्याबाबतचे संकेत दिलेत.

व्होडाफोनवर अधिकच्या करांमुळे अतिरिक्त भर पडतोय. त्यामुळे येत्या काळात भारतातून व्होडाफोन काढता पाय घेईल अशी शक्यता आता वर्तवली जातेय. स्पेक्ट्रम आणि परवाना शुल्क म्हणून सरकारकडून व्होडाफोन-आयडियाला तब्बल 40 हजार कोटी देण्यास सांगितले आहेत. दरम्यान सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचं व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

चर्चा योग्य दिशेने सुरु झाली : उद्धव ठाकरे 

आमच्यावर लादला जाणार कर याबाबत सर्वोच्च न्यायालय देखील प्रतिकूल आहे अशी भावना व्होडाफोन कडून व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान ब्रिटीश ऑपरेटरने भारतीय बाजारपेठेत होणारी गुंतवणूक सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

मंगेशकर कुटुंबीयांनी दिली दीदींच्या प्रकृतीबद्दल 'ही' महत्त्वाची माहिती

दरम्यान या संदर्भात व्होडाफोनकडून एक नोटीफीकेशन काढण्यात आलं. यात भारतीय माध्यमांमध्ये व्होडाफोन भारतातून जाणार अश्या बातम्या देण्यात आल्या असं नंद करण्यात आलं. मात्र माध्यमातील बातम्या या केवळ अफवा आहेत असं देखील या नोटीफीकेशनमध्ये नमूद करण्यात येतंय. 

Webtitle : very important news for all vodafone users

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: very important news for all vodafone users