आरटीई प्रवेशाला अत्यल्प प्रतिसाद; फक्त 'इतक्या' विद्यार्थ्यांचेच प्रवेश..

rte
rte

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के प्रवेश प्रकियेसाठी 5 हजार 371 विद्यार्थ्यांची सोडतीमधून निवड करण्यात आली होती. यापैकी आजपर्यंत केवळ 557 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे यंदा या प्रवेश प्रकियेला कोरोनाचा मोठा फटका बसून हजारो जागा रिक्त रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने 17 मार्च रोजी ही लॉटरी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी एकुण 14 हजार 135 अर्ज प्राप्त झाले. या अर्जाच्या काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये 5 हजार 371 विद्यार्थी सोडत पद्धतीने निवडण्यात आले. तर 3 हजार 421 विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 4 हजार 53 विद्यार्थी हे राज्य मंडळाच्या शाळांकरिता; तर इतर 1 हजार 318 विद्यार्थी अन्य मंडळाचे आहेत.

सोडतीमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थांच्या कागदपत्रांची पडताळणी शाळा स्तरावर करुन व संकलन करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. त्यासाठीची जबाबदारी पडताळणी समितीवर देण्यात आली आहे. e

यासाठी पालकांना शाळांमधून मसेज पाठवून ठराविक तारखांना बोलावून घेण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रात केवळ 557 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. या प्रवेश प्रकियेची अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नाही. यामुळे पालकांना प्रवेश प्रकियेत सहभागी होता येणार आहे.

very low response to RTE entrance 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com