'मदर इंडिया' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क | Tuesday, 28 July 2020

ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे आज सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले

मुंबई : मदर इंडिया, प्यासा, आँखे, ललकार, कोहिनूर, नया दौर, राजा और रंक, उजाला, गीत यांसारख्या हिंदी चित्रपटांबरोबरच काही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणारी ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे आज सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मरीन लाईन्स येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आजारामुळे निधन झाले. त्या 86 व्या वर्षांच्या होत्या.

महेश भट्ट यांच्या चौकशीत रिया चक्रवर्तीसोबतच्या संबंधांवर पोलिसांनी केली चौकशी - 

२२ एप्रिल १९३४ रोजी बिहारच्या शेखपुरा येथे जन्मलेल्या कुमकुमचे खरे नाव झैबुन्निसा होते. त्याचे वडील हुसेनाबादचे नवाब होते. कुमकुम यांनी “गंगा मैया तोहे पियारी चढ़ीबो” या पहिल्या भोजपुरी चित्रपटात काम केले. त्याचबरोबर अन्य काही भोजपुरी चित्रपटातही त्यांनी काम केले. अभिनेत्री कुमकुम यांना गुरुदत्त यांनी या इंडस्ट्रीत आणले. गुरुदत्त यांच्या  ‘प्यासा’ या चित्रपटात कुमकुम यांनी छोटीशी भूमिका केली. जवळजवळ शंभरहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये कुमकुम यांनी काम केले.  अभिनेता जगदीपचा मुलगा नावेद जाफरी यांनी ट्विट करून कुमकुम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  त्यांनी लिहिले, "आपण आणखी एक मोती गमावला. मी त्याला लहानपणापासूनच ओळखत होतो. त्या आमच्यासाठी फॅमिली होत्या. त्या एक व्यक्ती म्हणून खूप चांगल्या होत्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो."

--------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane