ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ शम्मी आन्टी यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

बॉलिवूडमध्ये 'शम्मी आन्टी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शम्मी (८९) यांचे आज (सोमवार) दीर्घकालीन आजाराने निधन झाले. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची बातमी दिली. बच्चन कुटुंबाशी शम्मी आन्टींचे खास नाते होते. 

शम्मी यांचे खरे नाव नर्गिस रबाडी होते. 24 एप्रिल 1920रोजी गुजरातच्या नारगोल संजान येथे त्यांचा जन्म झाला. पारसी कुटुंबात जन्मलेल्या नर्गिस या काही महिन्यांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. नर्गिस यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता. नर्गिस या अगदी योगायोगाने चित्रपटसृष्टीत आल्या.

दिग्दर्शक तारा हरीश यांनी नर्गिसला नर्गिस हे नाव बदलून शम्मी हे नवे नाव धारण करण्याचा सल्ला दिला. कारण नर्गिस नावाची एक अभिनेत्री आधीच चित्रपटसृष्टीत होती. नर्गिसने हा सल्ला ऐकला.

वयाच्या १८ व्या वर्षी शम्मी यांनी 'उस्ताद पेड्रो' हा पहिला चित्रपट केला. यात त्यांनी सहनायिकेची भूमिका साकारली. पुढे 'मल्हार' या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली.  

आपल्या सिनेकारकिर्दीत शम्मी यांनी दोनशेवर चित्रपट केले. चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही त्या दिसल्या. 'देख भाई देख' या मालिकेतील त्यांची भूमिका चागलिच गाजली. 'जबान संभाल के', 'फिल्मी चक्की'; या टीव्ही शोमध्येही त्या दिसल्या. शम्मी यांनी नर्गिस, मधुबाला, दिलीप कुमार यांच्या सारख्या दिग्गजांसोबत काम केले. 

Web Title: Veteran Bollywood actress Shammi passes away at 89