संगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर 

संगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर 

मुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्‍टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्यांना चिकनगुनिया आणि न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वीच जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. एक मूत्रपिंड खराब झाल्याने त्यांना पुन्हा अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com