ठाण्यात वृद्धांची कॅशलेस फसवणूक 

note-ban
note-ban

ठाणे - अमुक-तमुक बॅंकेतून बोलतोय. तुमचे एटीएम कार्ड बंद असून चालू करायचे आहे. त्यासाठी तुमचा एटीएम नंबर, सीसीव्ही नंबर आणि ओटीपी आम्हाला सांगा, असे फोन महिनाभरापासून ठाण्यातील वेगवेगळ्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना येत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करून 7 लाख 23 हजार 190 रुपयांची लूट झाल्याची बाब समोर आली आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या भागांमधून हे प्रकार समोर आले असून याहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नोटाबंदीनंतर कॅशलेस फसवणुकीचा प्रकार पुन्हा जोर धरू लागल्याचे चित्र आहे. 

केंद्राकडून नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर सगळ्याच नागरिकांनी बॅंकामध्ये धाव घेऊन पैसे भरण्यास सुरुवात केली. त्याच काळात पैशांवर आलेल्या निर्बंधामुळे अनेकांनी ऑनलाईन पद्धतीने पैसे काढण्यासाठी खात्यांमध्ये बदल करून घेतले. पारंपरिक पास बुक पद्धत कालबाह्य होऊन एटीएम, नेट बॅंकिंग आणि मोबाईल बॅंकिंगचा अंगिकार जुन्या पिढीतील अनेक मंडळींनी घेतला. सेवानिवृत्त, घरी राहणाऱ्या महिलांनीही ऑनलाईन बॅंकिंग सुरू केल्यानंतर त्यांना अचानक बॅंकांमधून फोन येण्यास सुरुवात झाली. बॅंकांमधून बोलत असल्याचे सांगत एटीएम नंबर, सीसीव्ही नंबर आणि ओटीपी नंबरही फोनवरील नागरिकांकडून काढून घेण्यात आले. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील देवयानी गोरे (वय 70) यांना एकाने फोन केला. एचडीएफसी बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएमची माहिती मागून त्यांच्या खात्यातून 30 हजार, तर त्यांच्या पतीच्या खात्यातून 9 हजार 998 रुपये लुटले. असेच प्रकार अन्य ज्येष्ठांच्याही बाबतीत घडले आहेत. 

ज्येष्ठ नागरिकांनी बळी पडू नये... 
ऑनलाईन पद्धतीने फसणवूक करणाऱ्या व्यक्ती हजारो नागरिकांना फोन करून बॅंक आणि एटीएमची माहिती मागत असतात. अनेक नागरिक अशी माहिती देणे टाळत असले, तरी ज्येष्ठ नागरिक याला बळी पडतात. नागरिकांनी बॅंक खाते, एटीएम आणि इतर महत्त्वाचे क्रमांक कोणालाही देऊ नयेत. नोव्हेंबर महिन्यातील काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना पूर्णपणे थांबल्या होत्या. डिसेंबरच्या उत्तरार्धात हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. 
- संदीप भाजीभाकरे, उपायुक्त, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा. 

फसवणूक झालेल्या व्यक्ती आणि रक्कम 
नाव रक्कम 
उल्हास बर्वे (64) 20 हजार 
गणेश कांबळे (20) 65 हजार 794 
धिरेन प्रजापती (40) 49 हजार 
रूपेश इंगळे (23) 57 हजार 369 
रमेश कडू (60) 43 हजार 500 
चंद्रकांत दळवी (62) 32 हजार 499 
सुवर्णा चव्हाण 23 हजार 560 
सुधा दावडे (40) 20 हजार 
टी. एस. बालकृष्ण (79) 2 लाख 
नारायण रंजलकर (83) 77 हजार 470 
रोहीदास खर्डे (54) 95 हजार 
देवयानी गोरे (70) 39 हजार 998 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com