कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर आत्मदहनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकाली गोंधळाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या अभिषेक सावंत या विद्यार्थ्याने आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. नव्या कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर आंदोलन करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

शंभर दिवस उलटूनही मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने अभिषेक याने 14 एप्रिलला विद्यापीठाच्या कालिना संकुलात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी अभिषेकवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे अभिषेकने सोमवारी (ता. 16) जाहीर केले. कायदा शाखेचे सर्वच निकाल प्रलंबित आहेत. त्यामुळे नवे कुलगुरू विद्यापीठात रुजू झाल्यानंतर त्यांचे आम्ही अनोख्या आंदोलनाने स्वागत करू, असे अभिषेक म्हणाला.

Web Title: vice chancellor selection suicide warning