मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल

तेजस वाघमारे | Saturday, 29 August 2020

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे. शनिवारी (ता.29) राज्यातील कुलगुरू सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही समिती रविवारी (ता.30) आपला अहवाल सरकारला देणार आहे. 

 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घेता येतील, यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे. शनिवारी (ता.29) राज्यातील कुलगुरू सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही समिती रविवारी (ता.30) आपला अहवाल सरकारला देणार आहे. 

मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी राज्यातील कुलगुरूंची बैठक घेतली. या बैठकीत सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंना परीक्षा घेण्या संदर्भातील अडचणी आणि त्यातील तरतुदींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कुलगुरूंचे मत जाणून घेऊन यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना राज्यातील एकाही विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याचा त्रास होणार नाही, अथवा विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. या परीक्षा सहज, आणि सुलभ पध्दतीने कशा आणि कधी घेता येतील यासाठीच कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक झाली. सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली आहे. 
ही समिती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर तातडीने म्हणजेच उद्या रविवार 20 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सामंत यांनी दिले आहेत. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. असेही सामंत यांनी संगितले.  

---------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवम