कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने मिळालेला विजय - राजेंद्र गवित

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

विजयी झाल्यानंतर हा विजय हा नशिबाने नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे मिळाला आहे, असे पालघर लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

पालघर - विजयी झाल्यानंतर हा विजय हा नशिबाने नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे मिळाला आहे, असे पालघर लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला विश्वास कार्यकर्त्यांनी सार्थ ठरवला आहे. मुख्यमंत्री फडणवीस खुप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, याचाही फायदा या निवडणुकीत झाला. आपण केलेल्या विकासकामांची मतदारांनी दिलेली ही पावती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीमुळे पक्ष सोडला असल्याचे मतही गावित यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवसेना आणि भाजपने ही लढाई प्रतिष्ठेची बनविली होती. त्यामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडियो क्लिपवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावर त्यांनी ही क्लिप बनावट होती, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा पराभव करुन राजेंद्र गवित विजयी झाले आहेत. 

Web Title: Victory credit goes to party Workers says rajendra gavit