मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात क्रिकेटर विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.. दारूच्या नशेत राहत्या सोसाटीतील रहिवाशाच्या गाडीला धडक मारल्याची तक्रार विनोद कांबळीविरोधात नोंदवण्यात आली. तसेच मद्यपान करून सोसायटीतील अन्य मेंबर्ससोबत गैरवर्तन केल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला होता. यानंतर विनोद कांबळीविरोधात गुन्ह्याची नोंदही झाली. अखेर त्याला ऑन टेबल जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Vinod kambli Arrested)
दरम्यान, विनोद कांबळी दारूच्या नशेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मिडियावर याची चर्चा आहे. या व्हिडीओत कांबळीचा पावलो पावली तोल जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. (Cricketer Vinod Kambli Receives On Table Bail by Mumbai Police)
काय आहे प्रकरण?
वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या 279, 336 आणि 427 कलमांसह मोटरव्हेईकल अॅक्ट १८५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कांबळीला अटक केली आहे. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आलं आहे. याबाबतचा अधिक तपास वांद्रे पोलीस करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.