शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवाजी शेंडगे असा हा सामना रंगणार आहे. जूनमध्ये या जागेसाठी मतदान होणार आहे. शिवाजी शेंडगे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. शिक्षकांचा पगार राष्ट्रीयीकृत बॅंकेत नियमित व वेळेवर जमा व्हावा, यासाठी शिवसेना आमदारांना एकत्रित करून त्यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. आझाद मैदानात धरणे आंदोलनासोबतच न्यायालयीन लढाईही त्यांनी लढली आहे. शिक्षकांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.
Web Title: vidhan parishad election shivaji shendage shivsena candidate politics