चुरशीच्या लढतींसाठी 99 टक्‍के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधान परिषद जागांसाठीची निवडणूक शनिवारी राज्यात शांततेत पार पडली. या सर्व मतदारसंघात सुमारे 99 टक्‍के मतदान झाले असून, मतमोजणी मंगळवारी (ता.22) होणार आहे.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती विरद्ध कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा लढतीने या निवडणुकीत सुरवातीला रंग भरला होता. मात्र, त्यानंतर कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'त आघाडीत बिघाडी झाल्याने सर्वच मतदारसंघात कॉंग्रेस एकाकी पडल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पुणे, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, नांदेड व जळगाव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज मतदान झाले.

पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत आहे. यवतमाळ-वाशीममध्ये शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस असा सामना आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला "राष्ट्रवादी'च्या उमेदवाराने थेट पाठिंबा दिल्याने कॉंग्रेस एकाकी पडली आहे. असाच पॅटर्न नांदेड मतदारसंघात कॉंग्रेसच्या विरोधात उभारण्यात आल्याचे चित्र आहे. येथे कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात सर्वपक्षीय पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. सांगली-सातारा मतदारसंघात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा सरळ सामना आहे. जळगावमध्ये मात्र भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार मैदानात आहे. या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असून, राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी देणारे हे निकाल ठरतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Web Title: vidhan parishad election voting