Vidhan Sabha 2019 : उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली. पण, धक्कादायकरित्या त्यात विनोद तावडे यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे विनोद तावडे नाराज आहेत का? पक्षाच्या या निर्णयामागे कोणती भूमिका आहे? याविषयावर तावडे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली. पण, धक्कादायकरित्या त्यात विनोद तावडे यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे विनोद तावडे नाराज आहेत का? पक्षाच्या या निर्णयामागे कोणती भूमिका आहे? याविषयावर तावडे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आघाडीचा मोठा निर्णय

'चूक झाली असेल तर सांगावे'
तावडे म्हणाले, ‘संघ आणि अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे माझ्यावर संस्कार आहेत. त्यामुळे मी नाराज नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली नसली तरी, यापूढे संघाला अभिप्रेत असणारे काम करतच राहणार आहे. उमेदवारी मिळाली नसली तरी, पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारणार आहे.’ गेल्या पाच वर्षांत कोणती एखादी चूक झाली, असे वाटते का? यावर तावडे म्हणाले, ‘माझी चूक झाली असेल तर, मला सांगावी. मुळात चूक झाली आहे, असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. पण, आताच्या घडीला या सगळ्याचा विचार करणार नाही. पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, यासाठी मी काम करणार आहे. आम्ही नेश फर्स्ट, मग पार्टी आणि मग स्वतःचा विचार करतो.’

माझी शिकार करून दाखवा : रोहित पवार

कार्यकर्त्यांना आवाहन 
उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांचे फोन येत असल्याचे सांगून तावडे म्हणाले, ‘मला अनेकांचे फोन येत आहेत. त्या सगळ्यांना माझे हेच सांगणे आहे की, त्यांना कशाचाही विचार न करता आता, पक्षाचे काम सुरू ठेवावे. मी सगळ्यांना तसेच आवाहन करतो.’ विनोद तावडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांना निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी ते विधानपरिषद सभागृहात सदस्य होते. गोपाळ शेट्टी खासदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. आता भाजपने त्यांच्या जागी, सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तावडे यांच्यासोबतच एकनाथ खडसे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp leader vinod tawde reaction after rejection by party