Vidhan Sabha 2019 : मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर गोंधळ 

Vidhan Sabha 2019 : मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर गोंधळ 

मुंबई, ता. 21  मुंबईत अनेक ठीकाणी मतदान केंद्रावर आज गोंधळाचे वातावरण होते. अनेक नागरिक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्यानंतर यादीत नाव नसल्यामुळे तसेच चुकीचे नाव असल्याने त्यांना मतदान करता आले नाही त्यामुळे मतदारांमध्ये संताप दिसून आला. 

एका भागातून दुसऱ्या भागात राहायला गेलेल्या नागरिकांच्या मतदान केंद्रांमध्ये बदल झाला आहे. त्यामूळे मतदानाच्या दरम्यान यादीत नावच सापडत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यातही मतदार यादीत चुकीच्या नाव असल्याने, मालाड, कलिना मतदारसंघासह अनेक मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. शिवाय मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडे नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सेवा नसल्याने, मतदारांचे नाव न सापडल्याने मतदारांनी संतापून घरी परत जाणे पसंत केले. 

मुंबईतील अनेक भागांमध्ये पुनर्विकासाची कामे सुरू असल्याने नागरिकांच्या वास्तव्याचे ठिकाण बदलले आहे. त्याशिवाय दुसऱ्या भागात राहायला गेलेल्या नागरिकांच्या सुद्धा मतदान केंद्रामध्ये बदल झाला आहे. नियमीत मतदान करणाऱ्या मतदान केंद्रावर नाव सापडत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. त्यामूळे अनेक मतदान केंद्रावर नागरिकांचा गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांना आपले नाव शोधून देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती केली होती. मात्र, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सेवा उपलब्ध नसल्याने मतदारांना निश्‍चित केंद्रावरील नाव शोधण्यासाठी अडचणी निर्माण झाली होती. त्यामूळे संतापून शकडो नागरिकांनी मतदान करनेच टाळले आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन प्रणालीने मतदारांनी नाव शोधण्यासाठी प्रसिद्धी करण्याची गरज होती. मात्र ते दिसून आले नाही. त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांमध्येही नाव शोधण्यासाठी संभ्रम असल्याने, मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. तसेच मतदार यादीत चुकीचे नाव, व इतर माहिती मुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नसल्याने मतदानाची टक्केवारी घटणार आहे. 

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क 

मतदानासाठी मतदारांनी मुंबईत अल्पप्रतिसाद दिला असला तरी अनेक कलाकारांनी मात्र मतदान करुन आपला हक्क बजावला आहे. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी कलाकारांनी यावेळी आवाहनही केले. अभिनेता अमिर खान, पत्नी किरण राव, शाहरुख खान, पत्नी गौरी खान, नाना पाटेकर अभिनेत्री दीपीका पादुकोण, पद्मिनी कोल्हापुरे, उर्मिला मातोंडकर, लारा दत्ता, महेश भूपती यांच्यासह अनेक हिंदी कलाकारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. 

मराठी कलाकारांनीही यावेळी मतदान केले. तसेच इन्स्ट्राग्रामवर व्हिडिओ व फोटो अपलोड करुन मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले. अभिनेता अतुल कुलकर्णी, सुनील बर्वे, प्रशांत दामले, अतुल परचुरे, प्रवीण तरडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रेणुका शहाणे, ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी मतदान केले. 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज मतदानाचा हक्क बजावला नाही. मागील आठवड्यात अमिताभ यांना रुग्णालयात दाखल झाले होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. अमिताभ यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते मतदान करण्यासाठी जाऊ शकले नाही.  

नाना पाटेकर यांनी दादर येथील बालमोहन विद्या मंदिर येथे मतदान केले. मतदानासाठी गर्दी कमी आहे ही खंत व्यक्त करताना सरकारने सक्ती केल्यावरच नागरिक मतदान करणारा का असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. मतदानाकडे केवळ सुट्टीचा दिवस म्हणून पाहू नका. मतदान केले नाही तर आपल्याला विकासकामे आणि देशहितवादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा काहीच अधिकार नाही, असेही नाना पाटकर यांनी मतदान न करणाऱ्यांना सुनावले. जर उमेदवाराने चांगले काम केले असेल तर लोक मत देतीलच. पक्षाने केवळ उमेदवारी जाहीर करावी. त्यामुळे निवडणुकीवरील अमाप खर्च करणे ही बंद होईल, असेही नाना यांनी म्हटले. 

WebTitle : chaos in mumbai while searching booth and voting

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com