उद्धव यांच्या उपस्थितीत भाजप नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष आणि भाजपशी संबधित असलेले नेते किशोर तिवारी यांनी प्रवेश केला. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतानाच आज आणखी शेतकरी नेता शिवसेनेच्या गळाला लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष आणि भाजपशी संबधित असलेले नेते किशोर तिवारी यांनी प्रवेश केला. 

किशोर तिवारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून भाजपमधून तिवारींचा सेनेत प्रवेश झाला असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. किशोर तिवारी यांनी भाजपचा सक्रिय सदस्य नसल्याचे यावेळी स्पष्ट करतानाच विदर्भ शिवसेनेच्या कायम पाठिशी उभा राहिल असेही त्यांनी म्हटले. उद्धवजी जेवढे जवळचे तेवढेच देवेंद्रजीही माझ्या जवळचे असल्याचे यावेळी तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, यावेळी आयोध्या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बयानबाजी करत नाही, हिंदुंच्या वतीने बोलतोय. न्यायदेवतेवर विश्वास असून हा खटला खूप वर्षे सुरु आहे. पुन्हा अयोध्येत जाणार आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास विश्वास असेल की, न्यायालय लवकर निर्णय देणार आहे तर थांबावं लागेल. आता पर्यंत बहुमताचे सरकार नव्हते, पण सेनेनं कधी सरकारला दगा दिलेला नाही. राजीनामे कुठं गेले, असे विचारलं जात होतं, पण शिवसेना कायम सरकारच्या मागे उभी होती, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 kishor tiwari joins shiv sena uddhav thackeray