Vidhan Sabha 2019 : मुंबईतील नेते, उमेदवार चिंतेत.. काय झालंय मुंबईत ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

  • नेते चिंतेत, कार्यकर्त्यांची धावाधाव
  • मतदारांचा मतदानासाठी अल्प प्रतिसाद

मुंबई,ता.21ः सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. मात्र, मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. मुंबईत रविवार पर्यंत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस असतांना सोमवारी सकाळ पासूनच ऊन पडायला लागली, त्यामूळे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारांना घराबाहेर निघत नसल्याने मुंबईतील नेते चिंताग्रस्त झाले असून कार्यकर्त्यांची मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी धावाधाव दिसून येत आहे. 

मुंबईतील मतदार बहुतेकवेळी सकाळीच मतदान करून कामावर किंवा कुटूंबासहीत फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. मात्र यावेळी असे कोणतेही नियोजन मतदारांचे दिसून येत नाही. सकाळ पासूनच मतदानासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 26 टक्के मतदानाची नोंद झाली असल्याने, नेत्यांमध्येही आता चिंता वाढली आहे. 

 

मुंबईत सकाळीच खरतर बॉलीवूड कलाकार घराबाहेर पडलेले पहायला मिळालेत. अशातच सर्व मोठे नेतेमंडळी देखील घराबाहेर पडलेले आपल्याला पहायला मिळालं. मात्र अशातच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी नेण्याचा प्रयत्न करत असतांनाही सध्या पाहायला मिळतंय. सध्या मुंबईत मतदारांना बूथ पर्यंत आणायला कार्यकर्ते आणि नेते मंडळींची धावाधाव दिसून येत आहे.

Webtitle : vidhan sabha 2019 low turnout of voters in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 low turnout of voters in mumbai

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: