‘काश्मीरमध्ये अंबानी-अदानी यांना जागा देण्याचा सरकारचा घाट’

टीम ई-सकाळ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. काश्मीरमध्ये उद्योगपती अंबानी आणि अदानी यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. काश्मीरमध्ये उद्योगपती अंबानी आणि अदानी यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभेतही भाजप विद्यमानांचे तिकीट कापणार?

आघाडीचा आता संयुक्त जाहीरनामा
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष संयुक्तरित्या जाहीरनामा देतील, असे मलिक यांनी स्पष्ट केले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता. पण, काँग्रेसने दोन्ही पक्ष एकत्रित लढत आहेत तर, जाहीरनामाही एकत्र देऊ, अशी भूमिका घेतली. त्याला राष्ट्रवादीने मान्यता दिल्यानंतर आता आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, 'युतीची मलाही तेवढीच चिंता'

नागालँडच्या स्वतंत्र झेंड्याबाबत भाजपची भूमिका काय?
मलिक यांनी पत्रकार परिषदेत राज्यासह केंद्रावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘1997 पर्यंत संघाने मुख्यालयावर झेंडा फडकवला नाही. आम्ही स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरी करत असताना आंदोलन उभं केलं म्हणून, भाजप व संघाने झेंडा फडकवण्याची सुरुवात केली. त्यामुळे अमित शहा यांनी काश्मीरबाबत केलेले वक्तव्य साफ खोट असून तिरंग्याचा तिटकारा असणारे आता तिरंग्याचे राजकारण करत आहेत.’ काश्मीरच्या वेगळ्या झेंड्याला विरोध मान्य पण नागालँडच्या स्वतंत्र झेंड्याबाबत भाजपची भूमिका काय? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

सावंतवाडीची जागा भाजपच लढवणार?

भाजपकडून भावनिक मुद्द्यांचे राजकारण
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काश्मीरचा मुद्दा चर्चेत आणला आहे, असा आरोप मलिक यांनी केला. ते म्हणाले, ‘फडणवीस सरकारने पाच वर्षांत ज्या कामाचे भूमीपूजन केले ते काम पूर्ण केल्याचा एकतरी प्रकल्प दाखवून द्यावा. आघाडी सरकारने सुरूवात केलेल्या कामाचे श्रेय घेत हे सरकार फिरत आहे. राज्यात कंपन्या बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याची चीड लोकांमध्ये आहे. त्यामुळेच भावनिक प्रश्नावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे.’ पर्यटनाच्या नावाखाली काश्मीरमधील जागा अंबानी आणि अदानी यांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने चालवला आहे, असा आरोप मलिक यांनी केला. काश्मीरमधून 370 कलम हटवण्यास आमचा विरोध नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे समर्थक आज भाजपच्या गोटात आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 maharashtra ncp nawab malik press conference