Vidhan Sabha 2019 : राज्यात मतदारांमध्ये निरुत्साह; मतदानाची टक्केवारी एवढीच

टीम ई-सकाळ
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण, अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांमध्ये कमी उत्साह असल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसत आहे. 

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण, अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांमध्ये कमी उत्साह असल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसत आहे. 

राज्यात दिग्गजांनी केले मतदान; पाहा कोणी कोठे केले मतदान

सकाळी नऊ पर्यंत 5 टक्केच मतदान
मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळच्या टप्प्यात केवळ 5.64 टक्के मतदान झाले होते. मुंबईत अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघांमध्येही सकाळच्या टप्प्यात 5.07 टक्के मतदान झाले होते. राज्यात पहिल्या टप्प्यात सरासरी 8 टक्के मतदान झाले आहे. शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या नालासोपाऱ्यात सकाळच्या टप्प्यात 5.9 टक्केच मतदान झाले होते. 

पाहा कोठे किती झाले मतदान?

 1. राज्यात अकरा वाजेपर्यंत सरासरी 15.56 टक्के मतदान
 2. भंडारा जिल्ह्यात 15 टक्के मतदान
 3. अमरावती जिल्ह्यात 15.11 टक्के मतदान 
 4. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 20 टक्के मतदान 
 5. धुळे जिल्ह्यात 17 टक्के मतदानाची नोंद 
 6. बुलडाण्यात 16 टक्के मतदान
 7. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 20 टक्के मतदान झाले 
 8. कोल्हापुरात एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याची घटना

पुणे जिल्ह्यात कोठे किती मतदान? (सकाळी 11पर्यंत)

 1. जून्नर - 22 
 2. आंबेगाव - 20.18
 3. इंदापूर - 18.5
 4. दौंड - 12 
 5. पुरंदर - 12.5 
 6. चिंचवड - 16.37 
 7. भोसरी - 11.55 
 8. कसबा - 5.67

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 maharashtra voting turnout low in first phase