Vidhan Sabha 2019 : पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना राज ठाकरेंचा आधार?; मनसे मते खेचणार?

टीम ई-सकाळ
Saturday, 12 October 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या जाहीर सभांमध्ये पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैव्यवहारावर बोट ठेवले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर या बँकेचे खातेदार असल्यामुळे त्यांनी आपल्या सभांमध्ये बँकेचा विषय मांडला. त्याचा सकारात्मक परिणाम मनसेला दिसू लागला आहे. बँकेच्या खातेदारांनी आज, मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन, त्यांच्या समस्या मांडल्या.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या जाहीर सभांमध्ये पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैव्यवहारावर बोट ठेवले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर या बँकेचे खातेदार असल्यामुळे त्यांनी आपल्या सभांमध्ये बँकेचा विषय मांडला. त्याचा सकारात्मक परिणाम मनसेला दिसू लागला आहे. बँकेच्या खातेदारांनी आज, मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन, त्यांच्या समस्या मांडल्या.

भविष्यात ते पेपर वाचण्यापुरते राहतील; उद्धव यांचा राज यांना टोला

राज ठाकरेंनी फोडली वाचा
रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक खातेदार, ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. अनेक ठेवीदार हतबल झाले आहेत. लग्न, शिक्षण, आजारपण यासाठी बँकेत पैसे ठेवलेल्या सामन्यांना आधार राहिलेला नाही. बँकेच्या ठेवीदारांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत घेराव घालून आपल्या समस्या मांडल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बँकेचा मुद्दा आपल्या भाषणांमध्ये घेतला. त्यामुळे हतबल ठेवीदारांना आता राज ठाकरे आपला आधार वाटू लागले आहेत. त्यामुळेच काही ठेवीदारांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

Image may contain: 15 people, including Vaidehi Vishal Kanekar, Swati Lokhande and Sachin Bhosale

मुंबईत मुद्दा गाजणार
मुंबईत पीएमसी बँकेचे ठेवीदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच बहुतांश ठेवीदार हे मराठी आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत उफाळून आलेला हा मुद्दा मतदानापर्यंत गाजण्याची चिन्हे आहेत. आता हे संतप्त ठेवीदार मतदान करताना कोणता निर्णय घेतील? याबाबत उत्सुकता आहे. ठेवीदारांनी जर, सत्ताधारी भाजपला नाकारले तर, मुंबईत त्यांना मनसेचा पर्याय असेल, अशी चर्चा आहे. त्यामुळेच राज यांनी या मतांकडे लक्ष ठेवून, आपल्या भाषणांमध्ये बँकेचा मुद्दा मांडला आहे. आता येत्या काही दिवसांत पुढच्या सभांमध्येही राज ठाकरे हा मुद्दा आणखी उचलून घेण्याची शक्यता आहे.

वाचा सामनाच्या अग्रलेखात शरद पवारांविषयी काय लिहिलयं

काँग्रेस-राष्ट्रवादी गप्पच
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी प्रमुख विरोधीपक्ष आहेत. त्यांनी पीएमसी बँकेचा मुद्दा उपस्थित करत, रान उठवण्याची गरज होती. परंतु, दोन्ही काँग्रेसने या मुद्द्याला फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. आता त्यांना निवडणुकीत ठेवीदारांच्या मतांचा कितपत फायदा होतो, हे पहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 pmc bank investors meet mns leader raj thackeray mumbai