पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा? मित्रपक्षांच्या नेत्यांच्या सह्याच नाहीत

टीम ई-सकाळ
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीची घोषणा कधी होणार? याची उत्कंठा लागून राहिली आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दोघेही माध्यमांना समोरे गेले पण, त्यांनी युतीची घोषणा केलेली नाही. मात्र, सायंकाळी एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीची घोषणा कधी होणार? याची उत्कंठा लागून राहिली आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दोघेही माध्यमांना समोरे गेले पण, त्यांनी युतीची घोषणा केलेली नाही. मात्र, सायंकाळी एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात युतीची घोषणा झाल्याचे सांगण्यात आले. अद्याप या पत्रकावर दोन्ही पक्षांकडून कोणतिही प्रतिक्रिया आलेली नाही. पत्रामध्ये युतीची घोषणा असली तरी युतीचा कोणताही फॉर्म्युला देण्यात आलेला नाही.

भाजपच्या मेगाभरतीत दोनच नेत्यांचा प्रवेश

मित्रपक्षाच्या नेत्यांच्या सह्या नाहीत
विशेष म्हणजे, या पत्रावर कोणत्याही नेत्याची सही नाही, किंवा पक्षाचा अधिकृत शिक्का नाही. पत्रावर भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती अशी महायुती निश्चित झाल्याचं शीर्षक देण्यात आलं आहे. पत्रकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सह्या आहेत. पण, सुभाष देसाई यांच्या सहीविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मुळात युतीचा अधिकृत असा कोणताही लोगो किंवा ध्वज नाही. पत्रकारवर शिवसेना-भाजपसोबत इतरही मित्र पक्षांची नावे आहेत. पण, त्या पक्षांच्या नेत्यांची त्यावर सही दिसत नाही. त्यामुळे युतीची घोषणा करणारे पत्रक खोटे असल्याचे स्पष्ट होत. आहे.

कोथरूडच्या मेधा कुलकर्णींचे 'असे' होणार पुनर्वसन

पत्रकात काय म्हटले आहे?
पत्रकात म्हटले आहे की, राज्यात गेली 5 वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार करत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख युद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत या नेत्यांचे चर्चेअंती महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्यावर एकमत झाले आहे. या पत्रातील एकूणच मजूकर पाहता हे पत्रक खोटे असल्याचे सष्ट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 yuti announcement fake press note shivsena bjp