esakal | Vidhan Sabha 2019 : मुंडे भावंडांमधील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : मुंडे भावंडांमधील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vidhan Sabha 2019 : मुंडे भावंडांमधील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात एका व्हिडिओ क्लिपमुळे उफाळून आलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यात त्यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता टोला लगावलाय. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले, 'मी काल टीव्हीवर पाहिलं. आमच्या विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यांवर आरोप झाले. त्यांनी त्यांच्या विरोधी  उमेदवारांचा उल्लेख बहिणाबाई असा केला आणि तो उल्लेख केला म्हणून, त्यांना चक्कर आली. त्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राचा अभ्यास नसावा. बहिणाबाई हे महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मानाचं स्थान आहे. त्यामुळं बहिणाबाई म्हटल्यानंतर त्यांना चक्कर येते, हे आश्चर्याचं आहे.'

पवार म्हणाले, 'लोकांच्या नाराजीचे समाधान करण्याची त्यांच्यात शक्ती नव्हती. लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांच्यात विशेषतः तरुणांमध्ये असलेला रोष मी पाहिला आहे. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाच्या सभांची सुरुवात भारतमाता की जय या घोषणेने होताना दिसत होती.'

Webtitle : vidhan sabha 2019sharad pawar on pankaja munde 

loading image