निघाला MIM च्या प्रचाराला, केला कॉंग्रेसमध्ये थेट प्रवेश; 'हा' निष्ठावंत आहे तरी कोण ?

निघाला MIM च्या प्रचाराला, केला कॉंग्रेसमध्ये थेट प्रवेश; 'हा' निष्ठावंत आहे तरी कोण ?

मुंबई, ता.17 : प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी जोर लावलाय.मात्र प्रचारासाठी निघालेल्या एमआयएम पक्षाच्या उमेदवाराने थेट काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा अजब प्रकार घडला आहे.मालाड विधानसभा मतदारसंघात ही प्रकार घडला असून यामुळे मतदार संघातील चित्रच पालटलं आहे.

मतदान काही दिवसांवर आल्याने सर्वच उमेदवार अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार करून मतदारांशी संपर्क साधत आहेत.एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख ही आपल्या प्रचारासाठी सकाळी घराबाहेर पडले होते. मात्र संध्याकाळी ते काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी मालवणी मध्ये आयोजित केलेल्या सभेत पोहोचले आणि तिथेच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत अस्लम शेख यांना पाठिंबा दिला.यामुळे इस्माईल शेख यांचे कार्यकर्ते ही चक्रावून गेले.मात्र काँग्रेस झिंदाबाद बोलण्याशिवाय एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडे पर्याय नव्हता.

उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात मालाड विधानसभा ही एकमेव विधानसभा अशी आहे जी गेली 10 वर्ष काँग्रेसकडे आहे.यामुळे काँग्रेसकडे असणारी ही एकमेव विधानसभा यंदा आपल्याकडे खेचण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपने केला आहे. त्यासाठी भाजपने कांदिवली पूर्वमधील काँग्रेसचे माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांना फोडून आपल्या पक्षात घेतलं.यानंतर त्यांनाच मालाड मधून उमेदवारी ही दिली.तर काँग्रेसने आपले माजी आमदार अस्लम शेख यांनाच पुन्हा मैदानात उतरले.मात्र  मुस्लिम बहुल मतदार असलेल्या मालाड मतदारसंघात एमआयएमने ही इस्माईल शेख यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली होती.

एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख यांनी जोरदार प्रचार करून अस्लम शेख यांच्या नाकीनऊ आणले होते.यामुळे महायुतीचे उमेदवार रमेशसिंग ठाकूर यांचं पारडं जड झालं होतं.मात्र अचानक एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख यांनी काँग्रेस उमेदवार अस्लम शेख यांना पाठींबा दिल्याने एमआयएमला देखील झटका बसला आहे तर या मतदारसंघात काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे.त्यामुळे ही लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी झाली असून मालाड विधानसभा जिंकण्याचे तयारीत असणाऱ्या युतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

WebTitle : vidhansabha 2019 MIM worker joined congress who is this person

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com