esakal | मुंबईत मराठीचा डंका, का धास्तावलेत गुजराती उमेदवार?
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत मराठीचा डंका, का धास्तावलेत गुजराती उमेदवार?
  • विधानसभा निवडणुकीत पुन्हा मराठीचं कार्ड
  • उत्तर भारतीय महापंचायत मराठीच्या बाजूने
  • मुलुंडमध्ये गुजराती उमेदवारातही धास्ती

मुंबईत मराठीचा डंका, का धास्तावलेत गुजराती उमेदवार?

sakal_logo
By
विकास मिरगणे

विधानसभा निवडणुकीच्या मनसेच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा मुंबईत मराठीचं कार्ड जोरात चालू लागलंय. इतकं की थेट उत्तर भारतीय महासंघच मनसेच्या बचावासाठी पुढाकार घेतोय.

झालं असं की, ऐरोलीत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी प्रांतवादाचं राजकारण करणाऱ्यांवर टीका केली होती. या पक्षांनी उत्तर भारतीयांचे ठेले तोडले होते. त्यावेळी, मी रस्त्यावर उतरून हल्ल्यांचा विरोध केला होता, असं तिवारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा उत्तर भारतीय महापंचायतीनं खरपूस समाचार घेतला. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत होते, तेव्हा कोणत्या बिळात लपून बसला होता. अल्पेश ठाकोरला पक्षात घेऊन सन्मान केला. मनसेची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे. तुम्हाला पैसे मिळतात, तेवढंच बोला, असा सज्जड दमच महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी दिलाय

  • दुसरीकडे मुलुंडमध्येही मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटलाय. हा मतदारसंघ गुजरातीबहुल असल्याचा दावा केला जातो. या मतांच्या जोरावर भाजप उमेदवार सहज निवडून येईल, असं वातावरण भाजपनं तयार केलं होतं.
  • त्याविरुद्ध आता इथल्या मराठी मतदारांमध्ये चांगलंच संतापाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचा अनुभव केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना नुकताच आला. त्यांच्या सभेकडे मराठी मतदारांनी पाठ फिरवल्यानं चक्क ती रद्द करत असल्याचं भाजपला जाहीर करावं लागलं.
  • मनसेनं त्यामुळेच या ठिकाणी आपली सर्व ताकत पणाला लावलीय. दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीही चौथ्या भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नुकताच दिलाय.


महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाचा टक्का प्रचंड घसरलाय. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आलेलं मराठीचं कार्ड कितपत यशस्वी ठरेल, हे निवडणुकीनंतर दिसेलच.

WebTitle : vidhansabha election 2019 mumbai politics revolving around marathi language