...अन्‌ विरोधी पक्षनेते डायसवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस पक्षासंदर्भात केलेल्या एका वक्‍तव्याने विधानसभेत एकच गदारोळ झाला. कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य या वेळी आक्रमक झाले. पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील अध्यक्षांच्या डायसवर चढून गेले होते. वसंत चव्हाण यांनी तर राजदंडही उचलला होता.

अध्यक्षांचे विधान रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी या वेळी करण्यात आली. आपण रेकॉर्ड तपासून पाहू व आवश्‍यकता असल्यास ते विधान काढून टाकण्यात येईल, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले व वादावर पडदा पडला.

कॉंग्रेसच्या नसीम खान यांना काही मुद्द्यांवर बोलायचे होते. आपल्याला बोलायची संधी द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या हातवाऱ्यांवर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आक्षेप घेतला व अध्यक्षांशी बोलण्याची ही पद्धत प्रथापरंपरेला धरून नाही. अध्यक्षांनी नसीम खान यांना समज द्यावी, अशी मागणी केली. तेव्हा नसीम खान यांना बोलण्याच्या ओघात बागडे यांनी कॉंग्रेस पक्षाबाबत काही वक्‍तव्य केले.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षांचा आदरच करतो, पण पक्षाबाबत असे बोलणे योग्य नसल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील तातडीने उभे राहत अध्यक्षांबाबत आम्हाला आदर आहे, पण कॉंग्रेस पक्षाबाबत असे वक्‍तव्य योग्य नाही. हे वक्‍तव्य कामकाजातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली. अध्यक्षांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक होत या वेळी मोकळ्या जागेत येत जोरदार घोषणाबाजी केली. पहिल्यांदाच विखे-पाटील हे देखील डायसवर चढल्याचे दिसून आले.

Web Title: vidhansabha opposition party leader confussion politics