विधिमंडळ प्रशासनाच्या बढत्या, नियुक्‍त्यांत घोळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - राज्यातील जनतेसाठी कल्याणकारी कायदे बनवणाऱ्या विधीमंडळ प्रशासनाच्या बढत्या, नियुक्‍त्यांत घोळ सुरू असून विधीमंडळ सचिवालय प्रशासनाची लक्‍तरे चव्हाट्यावर आली आहेत. अनेक महत्त्वाची पदे रिक्‍त असताना सध्याचे प्रधान सचिव अनंत कळसे हे येत्या ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. मात्र नियमित पदोन्नती रखडली असल्यामुळे प्रशासनात नाराजीचा सूर आहे. 

विधीमंडळ प्रशासनात सध्या सचिव, सहसचिव, विशेष कार्यकारी अधिकारी, उपसचिव ही पदे रिक्‍त आहेत. २००६ मध्ये सचिव पदी तर नंतर प्रधान सचिवपदी आरूढ झालेले कळसे यांनी तब्बल बारा वर्षे हे महत्त्वाचे पद सांभाळले आहे. . यातच काही उपसचिवांना डावलून इतरांना पदोन्नती देण्याचा घाट घातला जात असल्याची तक्रार सभापती यांच्याकडे केल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून पदोन्नती सभापतींनी थांबवली आहे. यामुळे रिक्‍त पदे कंत्राटी पद्धतीने भरून प्रशासनाचा गाढा हाकला जात आहे.

Web Title: vidhimandal administrative transfer