कुठे करतायत भाजपच्या महापौर राष्ट्रवादीचा प्रचार?

कुठे करतायत भाजपच्या महापौर राष्ट्रवादीचा प्रचार?

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेल्या सासूचा भाजपच्या महापौर असलेल्या सुनबाई खुलेआम प्रचार करतायत. भाजपने आमच्या सोबत धोका केला आणि म्हणूनच मी राष्ट्रवादीचा प्रचार करत असल्याचं महापौर पंचम कलानी यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यांनाच सर्व पद पाहिजेत का ? असा सवाल आता भाजपा शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी उपस्थित केलाय. 

उल्हासनगरमध्ये खरं तर ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या सुनबाई पंचम कलानी या भाजपच्या नगरसेविका आहेत. सासूबाई  निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पंचम कलानी या भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीचा खुलेआम प्रचार करत आहेत. यामुळे भाजपच्या गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

पंचम यांनी राष्ट्रवादीचा प्रचार थांबवला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. याबाबत पंचम कलानी यांना नोटीस पाठवल्याचंही भाजपने सांगितलं आहे. मात्र, पंचम यांनी आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं आहे.

भाजपने आमच्या परिवारासोबत धोका केला असून त्यांनी आम्हाला आमदारकीचं तिकीट देतो असं सांगितलं होतं. मात्र, त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला भाजपचे तिकीट दिल्याने मी राष्ट्रवादीचा प्रचार करत असल्याचे महापौर पंचम कलानी यांनी म्हटलंय.

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीतून कलानी विरुद्ध भाजपमधून आयलानी असा सामना असून याच वादातून हे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.

WebTitle : vidhnsabha bjp daughter in law supporting NCP mother in law in ulhasnagar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com