कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता वसई विरार महापालिकेने उचलले महत्वाचे पाऊल

vvmc.
vvmc.

वसई : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, वसई विरार महापालिकेने भविष्यातील उपाययोजना म्हणून वसई पूर्वेकडील वरुण इंडस्ट्री व वसई गावातील जी.जी.महाविद्यालय येथे रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. 

वसई गावातील जी. जी. महाविद्यालयात सध्या 750 खाटा असलेली व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयाची इमारत तळमजला अधिक एक अशी आहे. तर गेल्या चार ते पाच वर्ष बंद असलेली वसई पूर्वेकडील वरुण इंडस्ट्रीदेखील ताब्यात घेण्यात आली असून त्याठिकाणी कोरोना बाधितांना उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. या कंपनीत अतिजोखमीचे रुग्ण ठेवले जाणार आहेत. एकूण 1 हजार रुग्ण याठिकाणी राहू शकतात. शिवसेनेचे नवघर माणिकपूर शहरप्रमुख राजाराम बाबर यांनी याबाबत पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी जागेला भेट दिली होती. मात्र पैशाची अडचण पुढे आली होती. दरम्यान आयुक्त गंगाधान डी यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व खर्च जास्त नसल्याने काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणी विजेचे काम शिल्लक आहे ते पूर्ण झाले कि,  याठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु करण्यात येणार आहेत.

वसईत दोन ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार काम सुरु असून रुग्णांना याठिकाणी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्याची सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. -  गंगाधरन डी. आयुक्त,  वसई विरार महापालिका.

In view of the increasing number of corona positive, important steps taken by Vasai Virar Municipal Corporation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com