विजयस्तंभाचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली होती. 

कोरेगाव भीमा  येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दर वर्षी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होतात. विजयस्तंभाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये; तसेच कार्यक्रम सुरळीत व्हावा म्हणून नियोजन करण्यासाठी राज्य सरकारला या जागेचा ताबा हवा आहे, असा अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केला होता.

कार्यक्रम झाल्यानंतर जागा पुन्हा पूर्ववत करून देण्याची हमी त्यांनी राज्य सरकारच्या वतीने दिली. गेल्या वर्षी या काळात कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, म्हणून राज्य सरकारने या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या जागेचा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे सोपवण्यास न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने मान्यता दिली.

अशी असेल व्यवस्था
 कोरेगाव भीमाच्या चारही बाजूच्या आठ किलोमीटर परिसरावर ११ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
 नागरिकांसाठी ३०० पाण्याचे टॅंकर, १५० पीएमपीच्या बस, ११ ठिकाणी पार्किंग व्यवस्था
 पोलिसांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा १५ पट अधिक
 सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन

Web Title: Vijaystambh Possession State Government