विक्रमगड नगरपंचायत निवडणूक : 15 अर्ज बाद; 100 उमेदवार रिंगणात

Vikramgad Nagarpanchayat
Vikramgad Nagarpanchayatsakal media

विक्रमगड : नवनिर्वाचित विक्रमगड नगरपंचायतीची (Vikramgad nagarpanchayat election) येत्या 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहेत. एकूण 17 प्रभागाकरीता निवडणूक होत आहे. आज झालेल्या छाननीमध्ये 115 उमेदवारी अर्जापैकी 15 अर्ज बाद (Fifteen Application canceled) ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका पाटील (Priyanka Patil) यांनी दिली.

या अर्जामध्ये त्रुटी असल्याने अधिक अर्ज बाद झाले आहेत. आता 100 अर्ज वैदय आहेत. म्हणजेच सध्या एकंदरीत 100 उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र समोर आहे. परंतु 13 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकांचे खरे चित्र स्पष्ट होईल व अधिकृत उमेदवार समोर येतील. त्यामुळे कुणाही पक्षांची एकमेकांशी युती नसल्याने सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीचे संकेत आहेत. मात्र 15 बाद अर्जामध्ये भाजप, शिवसेना पक्षाती निष्ठावंत कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नाराज कार्यकर्ते,बाद उमेदवार यांचे कडुन पक्षा विरोधात काम केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान विक्रमगड नगरपंचायतीच्या मतदार संघांच्या निवडणुकीत भाजपा,श्रमजीवी संघटना,काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे आदी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. नगरपंचयतीच्या 17 प्रभागातील बदलेल्या राजकीय समीकरणामुळे ही निवडणूक म्हणजे सर्वच राजकीय पक्षाकरीता प्रतिष्टेचा विषय बनली आहे. व त्या प्रमाणे प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच या वेळी विक्रमगड विकास आघाडीला सत्ते पासुन खाली खेचण्यासाठी व निलेश सांबरे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस या पक्षातील स्थानिक पदधिकाऱ्यांन कडून व्युहरचना आखण्यास सुरुवात केली असून सर्व ताकदीनिशी ते या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

मात्र विक्रमगड नगरपंचायतीचा गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. ही नगरपंचायत काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्षही मोठया ताकदीनिशि रिंगणात उतरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने निलेश सांबरे यांच्या विक्रमगड विकास आघाडी विरोधात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि श्रमजीवी यांच्यामध्ये खरी लढत अपेक्षीत आहे. तर सर्वच राजकीय पक्षांकरीता ही निवडणूक महत्वाची व मोलाची ठरणारी आहे.

कारण पुढील विधानसभा निवडणुकीसाठी ही रंगीत तलीमच आहे. या नगरपंचायतीपुर्वी गेल्या पाच वर्षा पासुन असलेल्या सत्ताधारी पक्षांनी काय केले आहे,किती विकास कामे केली आहेत. कोणता विकास केला आहे. लोकांच्या समस्यांचे काय निवारण केले आहे. याचा ही विचार मतदार करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये प्रत्येक मत हे महत्वाचे व निर्णायक ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com