विक्रोळीत सुपर स्पेशालिटी रुग्णालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

घाटकोपर - विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील १४० खाटांची क्षमता असलेल्या शुश्रूषाच्या सुमन रमेश तुलसियानी (एसएसआरटीएच) या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्‌घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांनी केले.

घाटकोपर - विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील १४० खाटांची क्षमता असलेल्या शुश्रूषाच्या सुमन रमेश तुलसियानी (एसएसआरटीएच) या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्‌घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांनी केले.

या रुग्णालयाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते झाले होते. ते म्हणाले की, तीन वर्षांच्या अतिशय कमी कालावधीत शुश्रूषाच्या माध्यमातून हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभे राहिले आहे. ‘हे आरोग्य सेवा क्षेत्र आहे आणि येथे नफा न कमावता सेवा भाव मनी असणे आवश्‍यक आहे. या क्षेत्रातील सर्वसामान्यांचा वाढलेला खर्च कमी करण्यासाठी सरकारकडून विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरकारच्या माध्यमातून आवश्‍यक ती सर्व मदत सुश्रूषा रुग्णालयाला पुढील काळात केली जाईल,’ असे आश्‍वासनही फडणवीस यांनी या वेळी दिले. या वेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता व मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर या वेळी उपस्थित होते.

अंतर्गत व्यवस्था
तुलसियानी हॉस्पिटल (एसएसआरटीएच) या सहा मजली रुग्णालयात ईएमएस, डेकेअर, सामान्य व प्रसूती विभाग, वेगळे मोड्युलर ऑपरेशन थिएटर, २४ खाटा असलेला अतिदक्षता विभाग, आठ खाटांचे पीआयसीयू, सहा एनआयसीयू बेडस्‌, मोड्युलर प्रोसिजर रूम जोडलेले इमर्जन्सी, अपघात युनिट व सर्व सुविधांनी युक्त असे ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्‍स आहे.

Web Title: vikroli super speciality hospital