अलिबागमध्‍ये ग्रामसेवकांचा माेर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबई : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारीपद रद्द करून पंचायत विकास अधिकारीपद निर्माण करावे, प्रवास भत्ता प्रशासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन रायगड जिल्हा शाखेच्या वतीने माेर्चा काढला. या आंदोलनात शेकडो ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले होते.

अलिबाग पंचायत येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष नारायण म्हात्रे, नंदकिशोर भगत, अनिल पवार, तारामती दातीर, संजय पोळ, श्वेता कदम, प्रभाकर सांगवेकर आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. 

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतन त्रुटी दूर करणे, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर आगाऊ वेतनवाढ करून एक गाव एक ग्रामसेवकाची निर्मिती करणे. ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करणे अशा अनेक मागण्या सरकारदरबारी प्रलंबित आहेत. संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले; तरीही प्रशासनाकडून मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. 

पुढील आंदोलन 
येत्या 16 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. 20 ऑगस्टला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून मंत्री, राज्यमंत्री तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच 22 ऑगस्टपासून राज्यभर कामबंद आंदोलन करणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village volunteers march in Alibaug