विनायक मेटे यांना हटविण्याची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना हटवा, अशी मागणी मराठा आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्र्याकडे केली.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना हटवा, अशी मागणी मराठा आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्र्याकडे केली.

मंत्रालयात 43 मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. त्या वेळी मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. मराठा आरक्षणबाबत समाधान झाल्याचे समितीने स्पष्ट केले. मराठा आरक्षणाबाबत नऊ मागण्या सरकारकडे केल्या होत्या. त्यावर सरकारने सकारात्मक तोडगा काढला आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण समितीने घेतली.

छत्रपती शिवाजी स्मारक समितीची फेररचना करावी, समितीच्या अद्यक्षपदावरून विनायक मेटे यांना बाजूला करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Web Title: Vinayak Mete, who demanded to suspend