शिवसेनेच्या विनिता राणे कल्याण-डोंबिवलीच्या नव्या महापौर
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे यांची तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार कासिफ तानकी यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर महापौर पदासाठी भोईर यांनीही अर्ज दाखल केल्याने आज नेमके काय होणार याबाबत उत्सुकता होती.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी याही यावेळी उपस्थित होत्या. महापौर पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठीपंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. या वेळेत उपेक्षा भोईर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने विनिता राणे यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौर पदासाठीही याच पध्दतीने तानकी यांनी आपला अर्ज मागे घेतला. सेना गटनेते रमेश जाधव यांनी तानकी यांना हात धरुन अर्ज मागे घेण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांकडे नेले. यानंतर भोईर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणुक अधिकाऱ्यांनी तशी औपचिरिक घोषणाही केली.