अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई- बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयामधील अशक्तपणाचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या कुटुंबियांनी आज (गुरुवार) सांगितले.

मुंबई- बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयामधील अशक्तपणाचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या कुटुंबियांनी आज (गुरुवार) सांगितले.

विनोद खन्ना यांचे पुत्र राहुल यांनी सांगितले की, 'बाबांच्या शरिरामधील पाणी कमी झाल्यामुळे उपचारासाठी गिरगावातील एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये शुक्रवारी (ता. 31) रात्री दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून, डॉक्टर लवकरच त्यांना घरी सोडणार आहेत. डॉक्टर व हॉस्पिटल कर्मचाऱयांनी त्यांची खूपच चांगल्या प्रकारे काळजी घेतली. याबद्दल मी खूप आभारी आहे. शिवाय, आमचे कुटुंब त्यांची काळजी घेत आहे. त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून अनेकांनी प्रार्थना केली आहे. आमचे कुटुंब सर्वांचे आभारी आहे.'

दरम्यान, आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. विनोद खन्ना यांची प्रकृती चांगल्या प्रकारे सुधारली असून, त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 
अभिनेते विनोद खन्ना यांनी 1968 मध्ये 'मन का मीत' या चित्रपटात भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पन केले. 'मेरे अपने', 'कुर्बानी', 'पूरब और पश्चिम', 'रेशमा और शेरा', 'हाथ की सफाई', 'हेरा फेरी', 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. अभिनेता शाहरुख खान व वरुण धवन यांच्यासोबत 'दिलवाले' या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते.

Web Title: Vinod Khanna hospitalised due to severe dehydration, photo viral