नाट्य संमेलनाचे निमंत्रण अन्‌ बंद दाराआड खलबते 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील "कृष्णकुंज'वर जाऊन या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तावडे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड खलबते झाल्याची चर्चा रंगली आहे. 
भारतीय नाट्य परिषदेतर्फे 98 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या 13 जून ते 15 जून या कालावधीत मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. येत्या 25 जून रोजी मुंबई पदवीधर, शिक्षक विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेठी सुरू आहेत. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने भाजपच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. यासाठी तर ही चर्चा झाली नसावी का? याकडे लक्ष वेधले जात आहे. 

Web Title: vinod tawde invite for uddhav thackeray and raj thackeray