संपाला हिंसक वळण; एसटी व्यवस्थापकांनी बोलवली संघटनांसोबत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई : एसटी कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या अघोषित संपाला हिंसक वळण लागल्याने एसटी व्यवस्थापकांनी मुंबई येथे बैठक बोलवली आहे. काल झालेल्या संपात एसटीला 15 कोटी रूपायांना फटका बसला असून संपाची तिव्रता वाढतच आहे. त्यामुळे संपातून तोडगा काढण्यासाठी सर्व एसटी संघटनांच्या अध्यक्षांची बैठक बोलवण्यात आली आहे. 

कोणत्याही संघटनेने संपाची नोटीस न देता राज्यातील एसटी कामगार संपावर गेला आहे. याचाच अर्थ ऐतिहासिक वेतनवाढ म्हणून महामंडळाकडून केली गेलेली घोषणा कामगारांना समाधानकारक नाही हेच सिद्ध होते. त्यामुळे आता तरी  कामगारांच्या भावनांची दखल घ्यावी असे भावनिक आवाहन मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. त्याच आवाहनाला प्रतिसाद देत एसटी व्यवस्थापनाने आज मान्यता प्राप्त संघटनेसह 22 संघटनांच्या अध्यक्षांशी बैठक बोलवली आहे. या बैठकिला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संपावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: violation in strike ask for the meeting