esakal | 'एसटी'तील नोकरभरतीत मराठ्यांवर गंडांतर ?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

'एसटी'तील नोकरभरतीत मराठ्यांवर गंडांतर ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी (ST) महामंडळातील खुल्या जागांवर विविध मागास घटकांतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. तसेच रोस्टर पूर्ण झाल्यामुळे मराठा उमेदवारांना नोकरभरती बद होण्याचा धोका असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे.

यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने आज एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्त्रे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. एसटीमध्ये २०१४ २०१६ आणि २०१८ मध्ये झालेल्या नोकरभरतीत मराठवाड्यातील अनेक मागासवर्गीय उमेदवार मराठवाड्याबाहेर नियुक्त झाले. नियुक्तीनंतर त्यांनी तातडीचे कारण देऊन, नियमानुसार, ओळख, वशिला आदी सर्व मागांनी मराठवाड्यात बदल्या करून घेतल्या. या बदल्या होताना त्यांना खुल्या जागांवर नेमले गेले. त्यामुळे आता मराठवाड्यातील जागा भरल्याने मराठा उमेदवारांना मराठवाड्यात नियुक्त्या मिळत नसल्याचा दावाही मराठा क्रांती मोर्चाांचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केला. त्यामुळे एसटीतील मराठा कर्मचाऱ्यांची संख्या घटली असून यापुढे खुल्या प्रवगांतील ४८ टक्के जागांवर मराठा उमेदवारांची भरती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा: विद्यापीठात परीक्षा निकालासाठी विद्यार्थी परिषदेचे ठिय्या आंदोलन, प्र-कुलगुरुंना दिले निवेदन

एसटीमध्ये सुमारे लाखभर कर्मचारी असून तेथेही नियमानुसार मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे. परंतु खुल्या वर्गातील ४८ टक्के जागांपैकी मराठवाडा विभागात आतापर्यंत मराठा कर्मचाऱ्यांच्या केवळ १२ टक्के जागा भरल्या आहेत; तर खुल्या वर्गाचे एकूण रोस्टर फक्त २० टक्के झाले आहे. खुल्या जागांवर मागासवर्गीयांच्या बदल्या झाल्याने भविष्यातही खुल्या जागांवर नोकरभरती होणार नसल्याची भीती आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

हेही वाचा: राज्यातील महिला सुरक्षेबाबत बैठक; गुन्हे कमी कसे होतील याबाबत चर्चा

याबाबतचे निवेदन आम्हाला मिळाले आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर माहिती घेऊन, सत्य परिस्थिती जाणून योग्य निर्णय घेतला जाईल.

-शेखर चत्रे, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ,

loading image
go to top