चेंबूरजवळ गाड्यांवर जमावाकडून दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर रास्ता रोका कऱण्यात आला. अपहरण झालेल्या मुलीचा पोलिसांनी शोध घेतला नाही. त्यामुळं स्थानिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला. यावेळी वाहनांची तोडफोड कऱण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मुलीचा पोलिस शोध घेत नसल्याच्या कारणातून तिच्या वडिलांनीही काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय.

Image may contain: 1 person, crowd and outdoor

Image may contain: 2 people, people standing, people walking and outdoor

सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सर्व आंदोलकांना पंगवण्याचं काम सध्या सुरु आहे. या आंदोलकांमुळे इथल्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. अपहरण झालेल्या मुलीला शोधण्यासाठी पोलीस तब्बल सात महिने चालढकल केलीये. अशातच तिच्या वडिलांनीही ट्रेनखाली आपला जीव दिला होता. त्यांच्याच अंत्ययात्रेदरम्यान या समाजबांधवांचा बाध फुटला आणि चेंबूरमध्ये रास्तारोको करण्यात आला.  

Webtitle : violent mob starts stones collide on vehicles at chembur

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: violent mob starts stones collide on vehicles at chembur