'तो' व्हिडिओ डोंबिवलीतील नव्हेच; व्हायरल व्हिडिओचं सत्य अखेर उघड... 

शर्मिला वाळुंज  | Monday, 27 July 2020

नालासोपारानंतर आता डोंबिवलीकरांचा संयम सुटला, अशा आशयाचा संदेशही व्हायरल होत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात खरेच असे काही झाले का याची विचारणा नागरिक हा व्हिडिओ व्हायरल करुन करीत होते.

ठाणे :  लॉकडाऊन काळात संयम बाळगून असलेले नागरिक लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडले आहेत. परंतू वाहतूकीची पुरेशी सोय नसल्याने प्रवाशांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा या संयमाचा बांध फुटल्याने पाच दिवसांपूर्वीच प्रवाशांनी नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. या घटनेचे पडसाद मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातही उमटण्यास वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया त्यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....​

''नालासोपारा येथील रेल रोको आंदोलनाची पुनरावृत्ती अखेर डोंबिवली स्थानकात झाली. डोंबिवलीतील प्रवाशांनीही सोमवारी रेल रोको आंदोलन केले.'' असा मजकूर आणि त्यासोबत एक व्हिडीओ सकाळपासून समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. ज्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ येईल तो कोणतीही शहनिशा न करता केवळ पुढे फॉरवर्ड करत असल्याने दिवसभर डोंबिवलीत असे आंदोलन झाले का ? याचीच चर्चा केवळ डोंबिवलीत नाही तर मुंबईतही रंगली. मुंबईतील नागरिक डोंबिवलीकरांना हा व्हिडीओ पाठवून असे घडले का याचीच विचारणा करीत असल्याचे दिसून आले. परंतु हा व्हिडिओ पश्चिम रेल्वे स्थानकातील असून एका चुकीच्या संदेशामुळे दिवसभर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत होता. 

मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

त्यासोबतच नालासोपारानंतर आता डोंबिवलीकरांचा संयम सुटला, अशा आशयाचा संदेशही व्हायरल होत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात खरेच असे काही झाले का याची विचारणा नागरिक हा व्हिडिओ व्हायरल करुन करीत होते. दुपारनंतर तर मुंबईतही या व्हिडिओची चर्चा होऊ लागली. मुंबईतील नागरिक डोंबिवलीत असे काही झाले का? अशी विचारणा डोंबिवलीकरांना करु लागले. डोंबिवलीच्या नावे व्हिडिओ व्हायरल होत असल्यानेही अशी विचारणा होत असल्याचे निदर्शनास येत होते. परंतg डोंबिवलीत अशी कोणतीही घटना घडलेली नव्हती. त्यामुळे या प्रश्नांना उत्तर देता देता डोंबिवलीकरांच्याही नाकी नऊ आले होते. 

कोरोनाला रोखण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांकडून 'हा' पॅटर्न लागू

डोंबिवली रेल्वे स्थानकात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. व्हिडिओ आपण बारीक लक्ष देऊन पाहिल्यास रेल्वेवर WR (पश्चिम रेल्वे) असे लिहिलेले असल्याचे आपल्या लक्षात येईल. याचा अर्थ हा व्हिडीओ पश्चिम रेल्वे स्थानकातील आहे. नागरिकांनी व्हिडीओ व्हायरल करताना थोडी शहनिशा करत जावी. एका चुकीच्या संदेशामुळेही अनेक अफवा पसरु शकतात, याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. 
- सतिश पवार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, डोंबिवली रेल्वे पोलिस.

----
संपादन : ऋषिराज तायडे

दोरीच्या साहाय्याने तिसऱ्या मजल्यावर उतरत शिक्षिकेने केली चिमुरडीची सुटका

गोपाळपट्टी जवळील चिलई रस्त्यावरील कमल पार्क येथे रोहिदास भांडवलकर यांचे चार मजली घर आहे. त्यातील तिसऱ्या मजल्यावर सुशांत यादव हे पत्नी व आराध्या या मुलीसह भाड्याने राहत आहेत. यादव कामावर गेले होते. पत्नी व मुलगी घरी होत्या. आराध्या घरात असताना सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आई कपडे सुकत टाकण्यासाठी इमारतीच्या छतावर गेली होती. आई खाली आली असता घराचा दरवाजा आतून बंद झालेला होता. प्रयत्न करूनही तो उघडत नसल्याने त्या घाबरून गेल्या. घरात असलेल्या आराध्याकडून आतून कडी लागली गेली होती. तीही घाबरून रडत होती.