
मुंबई : विरार मध्ये विषबाधेतून एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील पाचही मुलांना विषबाधा झाली असून एक ८ वर्षीय मुलीचा आणि ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
(Food Poisoning Death In Virar)
विरारच्या पूर्वेला टोकरे या गावात अश्पाक खान हे आपल्या कुटुंबासोबत राहतात शुक्रवारी रात्री या सर्वांनी एकत्र जेवण केलं होतं. त्यानंतर काल सकाळी त्यांच्या ९ वर्षाच्या मुलाला आणि ८ वर्षाच्या मुलाला उलटी झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोघेही यामध्ये मृत्यू पावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बाकीच्या तीन मुलांवर उपचार सुरू आहेत.