...म्हणून शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद

...म्हणून शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर कोरोनाचा शिरकाव झाला असतानाच शेजारी असलेल्या शिवसेना भवनातही कोरोनानं शिरकाव केला आहे. शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणारेय. 

शिवसैनिक कोरोनाशी लढण्यासाठी मदतकार्य करत असतात आणि त्यासाठी अनेकांच्या संपर्कात येतात, त्यामुळेच एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाली असावी. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचं शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं.

कोरोनाची लागण झालेला शिवसैनिक नियमित शिवसेना भवनमध्ये येत असतो. सध्या शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले असून कालपासून  निर्जंतुकीकरणाचे कामही सध्या सुरु आहे. दरम्यान नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या सूचनाही पक्षानं दिल्यात.

शिवसेना भवनात नुकताच पक्षाचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी शिवसेना भवनात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित होते. 

पुन्हा राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनाचा शिरकाव

आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनानं शिरकाव केला आहे. राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही वाहन चालकांवर सध्या मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाला होता. कारण राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले. त्यानंतर आता दोन वाहन चालकांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com