विठुरायाची सजावट करणार डोंबिवलीतले फूलवाले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

डोंबिवली - कार्तिकी एकादशीनिमीत्त सर्व वारकरी संप्रदायाची माऊली असलेल्या विठुरायाच्या मंदिराची संपूर्ण फुलांनी सजावट करण्याचे भाग्य डोंबिवलीतील दोन फुलांचा व्यवसाय करणाऱ्या वारकऱ्यांना मिळाला आहे. गतवर्षापासून हे वारकरी विठुरायाची सेवा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. 

डोंबिवली - कार्तिकी एकादशीनिमीत्त सर्व वारकरी संप्रदायाची माऊली असलेल्या विठुरायाच्या मंदिराची संपूर्ण फुलांनी सजावट करण्याचे भाग्य डोंबिवलीतील दोन फुलांचा व्यवसाय करणाऱ्या वारकऱ्यांना मिळाला आहे. गतवर्षापासून हे वारकरी विठुरायाची सेवा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. 

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा गाभारा, चौखांबी, रुक्‍मिणी मंदिर, मंदिरांचा आतील सर्व भागांची विविध प्रकारच्या रंगीबेरंगी ताज्या फुलांनी सजावट केली जाणार आहे. विठ्ठलाची अशा पद्धतीने पूजा करण्याचा मान पहिल्यांदाच डोंबिवलीच्या विठ्ठल दगडू मोरे व चेतन रमेश वैती यांना मिळाला आहे. मंदिर संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना याबाबत लेखी परवानगी दिली आहे. सजावटीसाठी तीन लाखांची फुले लागणार आहेत. गणेश मोरे, शशिकांत गायकवाड व सजावट कामातील अन्य 15 कारागीर यासाठी काम करणार आहेत. ही संपूर्ण सजावट पूर्ण करण्यासाठी त्यांना 24 तास लागणार आहेत. बुधवारी हे सर्व जण मंदिराची मोजमापे घेणार आहेत. त्यानंतर गुरुवारी दुपारी तीन तासांत त्यांना सजावट पूर्ण करायची आहे. शुक्रवारी (ता. 11) आषाढी एकादशीला सर्व वारकरी व भाविकांच्या डोळ्यांचे या सजावटीने पारणे फिटेल, अशी सजावट करणार असल्याचे या दोघांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. विठुरायाच्या चरणी दादरमधून फुले नेण्यात आली आहेत. त्यात शेवंती आणि अस्तर या फुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापूर्वी या दोघांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिराची वार्षिक उत्सवाच्या प्रसंगी अशा पद्धतीने सजावट केली आहे. विठ्ठल मोरे यांनी हा सेवेचा मान मिळाल्याने जन्माचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांचे सहकार्य लाभल्याने डोंबिवलीतील नागरिकांकडून यंदाची फूलसेवा विठ्ठलचरणी अर्पण होणार आहे.

Web Title: vitthal mandir decoration under florist will Dombivali