विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी कळव्यात भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी कळवा, खारीगाव, विटावा परिसरातील नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी दर्शनासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांना ऋता आव्हाड यांच्या हस्ते तुळशीपत्र व विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले.

कळवा : आषाढी एकादशीनिमित्त कळवा येथील कावेरी सेतूमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या पाषाण मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कळवा परिसरातील विठ्ठल भक्तांनी पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी केली होती.

या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी कळवा, खारीगाव, विटावा परिसरातील नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी दर्शनासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांना ऋता आव्हाड यांच्या हस्ते तुळशीपत्र व विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले. या वेळी ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, ऋता आव्हाड, नगरसेवक महेश साळवी, वर्षा मोरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हटले की, "ज्या विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही, त्यांना प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाईचे दर्शन व्हावे, यासाठी या पवित्र मूर्ती येथे ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांनीही येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. भविष्यात कळव्यात 'संतभवन' उभारण्याचे स्वप्न आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Vitthal Rakhumais darshana devotees crowd coming at Kalawa