व्हीजेटीआयमध्ये अवतरले 'इस्रो'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्‍नोलॉजिकल इन्स्टिट्यूटचा (व्हीजेटीआय) टेक्‍नोवॅंझा महोत्सव शुक्रवारपासून (ता. 28) जल्लोषात सुरू झाला.

मुंबई - माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्‍नोलॉजिकल इन्स्टिट्यूटचा (व्हीजेटीआय) टेक्‍नोवॅंझा महोत्सव शुक्रवारपासून (ता. 28) जल्लोषात सुरू झाला.

या महोत्सवातील इस्रोवरील (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तंत्रज्ञानप्रेमींनी गर्दी केली होती. या प्रदर्शनात इस्रोचा इतिहास आणि कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अग्निबाण, अंतराळयान, उपग्रहांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. मंगळयान मोहिमेची तपशीलवार माहिती, छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. महोत्सवातील रोबोवॉर स्पर्धेत राज्याबाहेरील सुमारे 90 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

टेक्‍नोवॅंझा महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा ठेवण्यात आली होती. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी कार्ड पेपर आणि अन्य वस्तूंचा वापर करून आपल्या कल्पनेतील स्मार्ट सिटी अवघ्या 10 मिनिटांत साकारली. या स्पर्धेत अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत.

Web Title: VJIT technovanza mahotsav