प्रचाराने उडाली झोप 

रश्‍मी पाटील- सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

ठाणे - दुपारी छान डुलकी काढायची वेळ आणि घरातला फोन, मोबाईल ठणठणा वाजू लागतो... उठून फोन घ्यावा तर ... "नमस्कार कसे आहात ठाणेकर नागरिक, समस्यांनी बेजार, चिंता करू नका, आता वेळ आली आहे तुमच्या समस्या सोडवण्याची... योग्य मतदाराला निवडून देण्याची. तेव्हा अमुक चिन्हासमोरील बटण दाबून आपल्या प्रभागातील तमुक तमुक उमेदवारांना विजयी करा...' अशी भलीमोठी टेप वाजू लागते आणि दुपारच्या वामकुक्षीचे वाट्टोळे होते. तर संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर शांत बसावे, तर दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडावे तर ही उमेदवार आणि कार्यकर्त्यांची जंत्री दारात उभी. त्यामुळे मतदारांची संध्याकाळची शांतताही हरवली आहे. 

पॅनेलमुळे उमेदवारांची संख्या चौपट झाली असून, रोज कोणी दारावर किंवा फोनवर प्रचार केला जात आहे. त्यामुळे मतदारांची डोकेदुखी वाढली आहे. 

प्रचारासाठी दारावर येणाऱ्यांपैकी एखादा चेहरा ओळखीचा आणि बाकीचे अनोळखीच असतात. आमच्यासोबत यांनाही मतदान करा. आपल्याच पक्षाचे आहेत अशा विनवण्या केल्या जातात. वर्षभरात सोसायटीच्या पूजेला किंवा परिसरात मोठ्या कार्यक्रमाला स्टेजवर दिसणारी व्यक्ती आपल्यासोबत इतर दोन-तीन जणांसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी येत आहे. दिवसभरात कर्णा घेऊन प्रचार करत फिरणारे रिक्षावाले, टेम्पो व रॅलीमधील कार्यकर्त्यांनी सकाळपासून जोरदार घोषणाबाजी सुरूच असते. कधी कधी मोठ्या आवाजात पक्षाच्या गाण्याची टेप लावलेली असते. त्यात उमेदवारांचे कॉल सेंटरकडून सतत येणारे मेसेज आणि फोन यामुळे मतदार बेजार झाले आहेत. 

पॅनलमुळे अ ब क ड या विभागानुसार मतदारांनी चार उमेदवारांना निवडुन द्यायचे आहे. मात्र परिसराच्या कक्षा व उमेदवारांची संख्या चौपट झाल्यामुळे मतदारांना जास्त उमेदवारांच्या प्रचाराला सामोरे जावे लागत आहे. प्रस्तापीत उमेदवार इतर तीन विभागात दारोदारी जाऊन प्रचार करतोय तर नवोदित उमेदवार चारही विभागात झाडून प्रचार करताना दिसत आहे. 

Web Title: Voters headache increased