#VoteTrendLive मुंबईत शिवसेनेने 'करुन दाखविलं'

टीम ई सकाळ
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

करुन दाखवलं या टॅग लाईननंतर 'Did You Konw' असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शतकाजवळ मजल मारत खऱ्या अर्थाने करुन दाखविले. शिवसेनेनंतर भाजप दुसऱ्या स्थानी असून, शिवसेनेने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे.

मुंबई - करुन दाखवलं या टॅग लाईननंतर 'Did You Konw' असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शतकाजवळ मजल मारत खऱ्या अर्थाने करुन दाखविले. शिवसेनेनंतर भाजप दुसऱ्या स्थानी असून, शिवसेनेने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे.

शिवसेनेने सुरवातीच्या काही तासांतच 90 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाच्या माहितीचा गोषवारा त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्याच्यावरील गुन्हे आणि त्याला झालेली शिक्षा असा सर्व तपशील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक महत्त्वपूर्ण होती.

प्रभाग क्र. 1 मधून तेजस्विनी घोसाळकर यांनी विजय मिळवत शिवसेनेने पहिला विजय मिळविला. मुंबई महापालिकेत शिवसेनेची पहिल्यापासून आघाडी घेतली होती. 150 वॉर्डमध्ये गोंधळामुळे मतमोजणी थांबविण्यात आली होती. अखेरच्या माहितीनुसार शिवसेनेने 93, भाजप 61 काँग्रेस 22 मनसे 10, राष्ट्रवादी काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर होते. 

Web Title: VoteTrendLive Shivsena leading in Mumbai