मतदान करा, "मेंटेनन्स'मध्ये सूट मिळवा! 

मुंबई ः मतदानासाठी जनजागृती करताना सोसायटीचे पदाधिकारी.
मुंबई ः मतदानासाठी जनजागृती करताना सोसायटीचे पदाधिकारी.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदान व्हावे, याकरिता सरकारतर्फे जनजागृती केली जात असताना खासगी संस्थांनीही आपापल्या परिने यात सहभाग घेतला आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कांदिवलीतील धीरज एन्क्‍लेव्ह सोसायटीने मतदान करणाऱ्या सदस्यांना "मेंटेनन्स'मध्ये 200 रुपयांची सूट देण्यासह दिवाळीसाठी मातीचे दिवे भेट देण्याचे जाहीर केले आहे. 

"आमदार मतदारसंघात फिरकला नाही, आमच्या समस्या सोडवल्या नाहीत' असे म्हणत अनेकजण लोकप्रतिनीधींच्या नावाने बोटे मोडतात, तर काहीजण थेट मतदानावर बहिष्कार टाकतात. असे असले तरी अनेक जण आपल्या परीने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करतात. असाच उपक्रम राबवण्याचा निर्णय कांदिवलीतील धीरज एन्क्‍लेव्ह सोसायटीने घेतला आहे.

मतदान करणाऱ्या सदस्यांना मासिक मेंटेनन्समध्ये 200 रुपयांची सूट सोसायटीकडून दिली जाणार आहे. ही सूट वर्षभर मिळणार आहे. शिवाय, सदस्यांना दिवाळीसाठी दिवेही भेट देण्यात येणार आहेत. तशी पत्रकेही सोसायटीने वितरित केली आहेत. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ती आणि लहान मुलांनी ती घरोघरी वाटली. या सोसायटीत 154 सदनिका असून समितीने सोसायटीतील सदस्यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली आहे. 
.......... 
 
धीरज एन्क्‍लेव्ह सोसायटीतर्फे प्रत्येक निवडणुकीला असा उपक्रम राबवला जातो. संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाला सोसायटीतील सदस्य उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. यंदाही आमच्या सोसायटीतून 100 टक्के मतदान होईल. 
- रवी गायकवाड, अध्यक्ष 
धीरज एन्क्‍ल्वेव्ह सोसायटी, कांदिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com