खारघरमध्ये 100 मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

खारघरमध्ये मतदार संख्या आणि मतदान केंद्र वाढले आहे. मतदान योग्य प्रकारे आणि सुरळीत पार पडावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- अशोक दुधे, पोलिस उपायुक्त परिमंडळ पनवेल

खारघर : खारघर वसाहत, परिसरातील पाडे आणि गाव असे मिळून एक लाख पाच हजार  मतदार असून त्यासाठी निवडणूक विभागाने परिसरात एकूण शंभर मतदान केंद्र उभारले आहे.

पनवेल विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त मतदार संख्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर वसाहती युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अधिक लक्ष घातले आहे. खारघर सेक्टर 2 ते 21 मधील मुर्बी, बेलपाडा, कोपरा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि खारघर वसाहती मधील गोखले, ग्रीन फिंगर, रायन इंटर नॅशनल, अपीजय, सुधागड डीएव्ही पब्लिक स्कुल, रेडक्लिप आदी शाळा आणि पेठ, पेठगाव, रांजणपाडा, ओवेकॅम्प आदी गावातील जिल्हा परिषद शाळा असे एकूण शंभर मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

खारघर वसाहतीमध्ये प्रथमच एक लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी झाली आहेत. त्यात खारघरमध्ये घरे घेऊन स्थायिक झालेल्या काही तरुण मतदार प्रथमच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे खारघरमधील मतदार कोणत्या उमेदवाराला पसंती देणार हे 23 मे ला कळणार आहेत.

खारघर वसाहतीत भाजपचे बारा नगरसेवक आहे.लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार आहे. परंतु येणाऱ्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्यामुळे भाजपने गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूकीचे नियोजन केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप कडून आमदार प्रशांत ठाकूर हे उमेदवार असणार आहे. त्यामुळे भाजपने सेने पेक्षा अधिक जोर दिला आहे. तर आघाडीकडून शेकापचे प्रीतम म्हात्रे हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारणे हे बहुमतांनी निवडून आले होते. मात्र गेल्या पाच वर्षात खारघरमध्ये एकही विशेष कामे केली नाही.त्यामुळे मतदार पुन्हा बारणे बहुमत देणार की पार्थला पसंती देणार याकडे लक्ष लागले आहे.

खारघरमध्ये मतदार संख्या आणि मतदान केंद्र वाढले आहे. मतदान योग्य प्रकारे आणि सुरळीत पार पडावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- अशोक दुधे, पोलिस उपायुक्त परिमंडळ पनवेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voting centers in Kharghar