प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - सांगली- मीरज- कूपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी; तसेच वसई- विरार महानगरपालिकेतील रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 5 जून रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले, की या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 5 जून रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 14 जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 जून रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 जून रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Web Title: voting list municipal election